बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.7 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 708 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 41 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 667 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-10, आष्टी-7, धारुर-3, गेवराई-2, केज-2, माजलगाव-1, परळी-9, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आज आठ तालुक्यात केवळ 41 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 149, शुक्रवारी 116, शनिवारी 115, रविवारी 48 तर आज 41 बाधित आढळले आहेत. आज सर्वाधिक अंबाजोगाई तालुक्यात 10 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या रविवारच्या नोंदीनूसार 177 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2858 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 723 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 4.01 टक्के, रिकव्हरी रेट 96.68 तर डेथ रेट 2.64 आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असून, आज राज्यात केवळ ९ हजार ६६६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, अवघे ६६ रुग्ण दगावले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही २५ हजार १२५ इतकी असून, सक्रिय रुग्ण १ लाख ३३ हजार इतके आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ३ हजार ७०० झाली आहे. यापैकी २ हजार २३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण ७ हजार १४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असनू त्यापैकी ६ हजार ८५५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहते. १५९ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहते. राज्यात आज रोजी एकूण १ लाख १८ हजार ७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!