धारुर, केजमध्ये किंचित वाढ… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट.

बीड दि.24 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 4066 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 151 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3915 जण निगेटिव्ह आली आहेत. वाढत असलेल्या संख्येमुळे गेल्या काही दिवसात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आजच्या अहवालात अंबाजोगाईत समाधानकारक तर केज व धारुरमध्ये वाढ दिसुन आली.

(Today’s Corona Update in Beed District; The country has crossed the 3 crore patient mark.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-25, अंबाजोगाई-1, आष्टी-25, धारुर-12, गेवराई-21, केज-28, माजलगाव-11, परळी-5, पाटोदा-10, शिरुर-6, वडवणी-7 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत पुन्हा ब्रेक लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्यात नवीन डेल्टा प्लस वेरिअंटचा धोका वाढत आहे. नवीन 21 रुग्ण आढळल्याने पुन्हा निर्बंध वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातही रुग्ण वाढ.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. आज 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!