‘त्या’ अपघातातील मृतांची ओळख पटली; भाजप आमदार पुत्राचा मृतात समावेश.

वर्धा दि.25 जानेवारी – वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात भावी डॉक्टर युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली असून यामध्ये एका आमदाराच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
(The dead in the accident were identified; BJP MLA’s son among the dead.)
पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात (Accident) घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतील सर्वच युवक गतप्राण झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास या बाबत माहिती मिळाली. त्याने वर्धेकडे (Wardha) सलोडला येताना सावंगी पोलिसांना (Police) यासंदर्भातील माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस पोहोचले. मृतात सातही युवक दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील (Medical college) MBBS चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub-Divisional Police Officer) पियुष जगताप यांनी सांगितले की सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले. यात तिरोडा येथील भाजपा (BJP) आमदारांचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी मदत करणाऱ्यांमध्ये होती. मृतात अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालें यांचा एकुलता एक मुलगा होता.
मृत युवकांची नावे
निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अपघातातील मृतांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. मृत विद्यार्थ्यांंच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे.