कोरोंना विशेष

बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; बीड साडेतीनशे, धारुर 72, केज 145… पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.28 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4489 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1346 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3143 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, राज्यात काल दिलासा मिळाला असून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त दिसुन आली.

(Today’s Corona Update of Beed District; See Taluka wise statistics.)

आज त्रेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 348 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 260, आष्टी तालुक्यात 54 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 72 तर केजमध्ये 145 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-348, अंबाजोगाई-260, आष्टी-54, धारुर-72, गेवराई-131, केज-145, माजलगाव-58, परळी-75, पाटोदा-67, शिरुर-79, वडवणी-57 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अख्ख्या देशभर वाढलेला आहे. राज्यापाठोपाठ बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हजाराच्या आत असणारी आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून हजाराचा टप्पा पार ओलांडत आहे. सध्याची राज्याची परिस्थिती पाहता राज्य शासन लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 66 हजार 358 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 895 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

आज 67 हजार 752 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 895 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची (Corona Death) नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.05 टक्के एवढा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!