बीड जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.24 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 6529 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 824 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5705 जण निगेटिव्ह आली आहेत. राज्या पाठोपाठ बीड जिल्ह्यातही बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. काल मात्र जिल्ह्यात चाचण्या वाढल्यामुळे बाधितांची संख्या किंचित वाढली.

(Today’s corona update of Beed district; See Taluka wise statistics.)

आज बीड तालुक्यात 201 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 57 व आष्टी तालुक्यात 182 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 44 तर केजमध्ये 78 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात आज बीड व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आली आहेत.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-201, अंबाजोगाई-57, आष्टी-182, धारुर-44, गेवराई-54, केज-78, माजलगाव-51, परळी-21, पाटोदा-65, शिरुर-49, वडवणी-22 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसांपासून हजाराच्या आत आहे. अजूनही ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. देशासह राज्यात दिलासादायक आकडेवारी असली तरी मृत्यू दर मात्र अधिक आहे. बीड जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध उद्या 25 मेपर्यंत राहणार आहेत.

राज्याची कोरोना स्थिती ….
दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यात 29 हजार 177 रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर 26 हजार 672 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. आज राज्यात 594 रूग्णांना कोरोनामुळे जीव गमावावा लागल्याचे समोर आले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 51,40,272 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) 92.12 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,30,13,516 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,79,897 (16.9 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26,96,306 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,771 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 3,48,395 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!