बीड जिल्ह्याची आजची संख्या 1273; गेवराई 347, केज 117 तर धारुर 32, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.9 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4270 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1273 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2997 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s number of Beed district is 1273; Gevrai 347, Cage 117 and Dharur 32, see taluka wise statistics.)
आज पंच्चावनव्या दिवशी बीड तालुक्यात 295 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 152, आष्टी तालुक्यात 43 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 32 तर केजमध्ये 117 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-295, अंबाजोगाई-152, आष्टी-43, धारुर-32, गेवराई-347, केज-117, माजलगाव-64, परळी-99, पाटोदा-39, शिरुर-43, वडवणी-42 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजारापर्यंत वाढली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात जाहिर केलेला कडक लॉकडाऊन पुन्हा चार दिवस वाढवून 12 मे पर्यंत कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले होते. यात आता ईदच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस सकाळी 7 ते 10 शिथिलता देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यात दिवसभरात 82 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात 52 हजार 605 रुग्ण तर 864 मृत्यूंची नोंद झाली आहे.