उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवला; पंकजा मुंडेंची पवारांवर नाराजी.

बीड दि.18.जून – बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 2 तसा 30 मिनिटे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर परतणाऱ्या गाड्यांचा ताफा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला. याप्रकारानंर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पवारांवर नाराजी व्यक्त केली.
(Deputy Chief Minister Ajit Pawar’s convoy blocked; Pankaja Munde’s displeasure.)
शेकडोच्या संख्येने जमा झाले होते आरोग्य कर्मचारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना, या कंत्राटी कर्मचाऱ्याना (Contract health workers) अजित पवार (Ajit Pawar) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांना भेटू दिले नाही.
त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघताच त्यांच्या गाडीचा ताफा अडवला, मात्र या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाढयाचा ताफा पुढे निघाला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांना या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर (Contract health workers) लाठीचार्ज केला आहे.
युवकाचा गोंधळ.
पवारांच्या दौऱ्यात युवकाने केली घोषणाबाजी
बीड जिल्ह्याच्या आढावा बैठक सुरु असताना, बाहेर एका युवकाने जोरजोरात घोषणा दिल्या. दरम्यान, घोषणा दिलेल्या युवकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. अजित पवार बीड जिल्ह्याच्या खरीप हंगाम , आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेत असताना सदर प्रकार घडल्याने काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंकजा मुंडेनी व्यक्त केली नाराजी.
या संपूर्ण प्रकारावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले, अशा शब्दात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधील पोलिसांच्या लाठीमाराच्या प्रकारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.