दिलासा … बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.17 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 3119 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 44 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3075 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांची संख्या पन्नासच्या आत आल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-17, अंबाजोगाई-3, आष्टी-6, धारुर-1, गेवराई-1, केज-7, माजलगाव-1, परळी-1, पाटोदा-5, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पन्नासच्या आत आलेली कोरोना बाधितांची संख्या चालू आठवड्यात वाढली आहे. गेल्यानंतर आठवड्यानंतर आज संख्या पन्नास पेक्षा कमी आलेली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सारखी चढ उतार दिसत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात गुरुवारी 3,595 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 20 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के आहे.

राज्यात गुरुवारी 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 342 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,65,29,882 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,11,525 (11.52 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,89,425 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!