बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची संख्या; पहा बीड जिल्ह्यातील तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.22 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2142 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 42 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2100 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-11, अंबाजोगाई-4, आष्टी-9, धारुर-1, गेवराई-2, केज-3, माजलगाव-4, परळी-0, पाटोदा-6, शिरुर-1, वडवणी-1 अशी आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी 3 हजार 131 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 4 हजार 021 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 40 हजार 712 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65 लाख 27 हजार 629 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 44 हजार 744 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.20 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात 70 कोरोना बाधित रुग्णांचा (Corona Positive) मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 616 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!