शुक्रवारी तीन बळी.. बीड जिल्ह्यातील शनिवारची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.25 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2027 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 32 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 1995 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग पाचव्या दिवशी बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. दरम्यान शुक्रवारी पुन्हा कोरोनामुळे तिघांचे निधन झाले आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-14, अंबाजोगाई-1, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-2, केज-1, माजलगाव-1, परळी-0, पाटोदा-8, शिरुर-0, वडवणी-1 अशी आहे.

बीड जिल्ह्यात शुक्रवारी 49 नवीन बाधित आढळून आली होती. तर 65 जणांना कोरोनामुक्त (corona free) झाल्याने घरी सुट्टी देण्यात आली. मात्र शुक्रवारीही कोरोनावर उपचार घेत असलेल्या 3 जणांचा बळी गेला. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2757 जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. आज सलग पाचव्या दिवशी बाधितांची संख्या समाधानकारक म्हणजेच पन्नासच्या आत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. राज्यात आज 3,286 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे. राज्यात आज 51 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!