शनिवारी दोन बळी.. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.26 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1971 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 28 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 1943 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग सहाव्या दिवशी बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. दरम्यान शनिवारी पुन्हा कोरोनामुळे दोघांचे निधन झाले आहे.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-7, अंबाजोगाई-4, आष्टी-6, धारुर-1, गेवराई-1, केज-4, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-2 अशी आहे.
बीड जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनावर उपचार घेत असलेल्या 3 जणांचा बळी गेला. हि शृंखला शनिवारीही सुरुच राहिली. शनिवारी दोन कोरोना बाधित दगावले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2759 जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. आज सलग सहाव्या दिवशी बाधितांची संख्या समाधानकारक म्हणजेच पन्नासच्या आत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी 3 हजार 276 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली ,तर 3 हजार 723 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 38 हजार 491 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 58 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 41 हजार 119 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 60 हजार 735 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.24 टक्के एवढे झाले आहे.