बळींच्या संख्येत पुन्हा वाढ.. बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची संख्या किती? पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.27 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1830 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 20 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 1810 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग सातव्या दिवशी बाधितांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. दरम्यान शनिवारी दोघांचे तर रविवारी कोरोनामुळे तिघांचे निधन झाले आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-9, अंबाजोगाई-1, आष्टी-1, धारुर-2, गेवराई-1, केज-0, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-5, शिरुर-1, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात शुक्रवारी 3, शनिवारी 2 तर रविवारी कोरोनावर उपचार घेत असलेल्या 3 जणांचा बळी गेला. हि शृंखला शनिवारीही सुरुच राहिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2762 जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. आज सलग सहाव्या दिवशी बाधितांची संख्या समाधानकारक म्हणजेच पन्नासच्या आत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधित मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. राज्यात 3 हजार 206 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या 3 हजार 276 इतकी होती. तर दिवसभरात एकूण 3 हजार 292 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या 3 हजार 723 इतकी होती.

राज्यात शनिवारी 58 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 36 रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचा मृत्युदर 2.12 टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबरच राज्यात एकूण 63 लाख 64 हजार 27 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के इतके झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!