चार दिवसात दहा बळी… बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.28 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2358 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 41 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2317 जण निगेटिव्ह आली आहेत. आज बाधितांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान रविवारी कोरोनामुळे तिघांचे तर सोमवारी दोघांचे निधन झाले आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-4, आष्टी-3, धारुर-2, गेवराई-5, केज-3, माजलगाव-3, परळी-3, पाटोदा-11, शिरुर-4, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात शुक्रवारी 3, शनिवारी 2, रविवारी 3 तर सोमवारी कोरोनावर उपचार घेत असलेल्या 2 जणांचा बळी गेला. कोरोना बळींची शृंखला सुरुच असून चार दिवसात 10 बळींची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2764 जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट झाल्याचे दिसत आहे. राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात 2,432 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,895 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 62 हजार 248 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.26 टक्के आहे.तसेच आज दिवसभरात 32 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 902 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!