लातूरमध्ये आढळला ओमिक्रॉनचा रुग्ण; मराठवाड्यात ओमिक्रॉनचा शिरकाव.

लातूर दि.13 डिसेंबर – लातूर (Latur) जिल्ह्यात ओमिक्रॉनचा (Omicron) रुग्ण आढळून आला असून या माध्यमातून मराठवाड्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. दुबईहून लातूर येथे आलेल्या एका युवकास ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूची बाधा झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली.
(Omicron patient found in Latur; Infiltration of Omicron in Marathwada.)
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हा युवक असून 8 डिसेंबर रोजी तो दुबई (Dubai) येथून मुंबईला व मुंबईहून (Mumbai) लातूरला आला. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची लातूर आरोग्य विभागातर्फे आरटीसीपीआर चाचणी (RTPCR Test) करण्यात आली. त्या चाचणीत या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला.
त्यानंतर येथील एका कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) त्याच्यावर उपचार सुरू होते. पुढील निदानासाठी त्याचा स्वॅब (Swab) पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेल्या रुग्णास अती सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत. प्रशासन पूर्णतः सज्ज असून लातूरकरांनी घाबरून जावू नये. परंतु, सतर्कता बाळगावी असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
संबंधित रुग्णास यापूर्वीच अलगीकरण कक्षात उपचार सुरू केले असून लातूरकरांनी घाबरून जावू नये. मास्कचा वापर करावा, ज्या व्यक्तींनी लस (vaccine) घेतली नसेल त्यांनी तातडीने लस घ्यावी, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.