बीडमध्ये पुन्हा तीन कोरोना बळी; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्येत ही वाढ..

बीड दि.1 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2353 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 48 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2305 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना आज वाढ झाल्याचे दिसत आहे. तर कोरोना मृत्यूची संख्येत 3 ने वाढ झाली आहे.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-12, अंबाजोगाई-6, आष्टी-6, धारुर-0, गेवराई-2, केज-1, माजलगाव-3, परळी-4, पाटोदा-12, शिरुर-2, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना आठवड्यात 15 मृत्यूची नोंद झाली आहे. यात 24 तासात 2 तर 1 जुने अपडेट नोंदवण्यात आले. बाधितांची संख्याही आज वाढली आहे. तर 23 जणं कोरोनामुक्त झाले आहेत. एकुण मृत्यूची संख्या 2771 झाली असून सध्या जिल्ह्यात 310 सक्रीय रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात काल 3,063 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 71 हजार 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे. गुरुवारी 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 396 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.