दिलासा… बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली; पहा काय आहे परिस्थिती.

बीड दि.3 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2020 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 22 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1998 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली असून आज पाच तालुके शुन्यावर आहेत.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-5, अंबाजोगाई-1, आष्टी-8, धारुर-0, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-6, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख मोठ्या प्रमाणात उतरला असून जनजीवन पुर्वपदावर आले आहे. आज एकुण पाच तालुके निरंक आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून चालू आठवड्यात मृत्यूची संख्या वाढली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 02 हजार 696 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 03 हजार 062 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 49 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 63 लाख 77 हजार 954 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.27 टक्के एवढा झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!