बीड जिल्ह्यात कोरोना चाचणी व बाधितांची निंचाकी संख्या; पहा काय आहे परिस्थिती.

बीड दि.4 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज केवळ 1103 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 17 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1086 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली असून आजची कोरोना संशयित चाचणी व बाधितांची संख्या दुसऱ्या लाटेतील निचांकी संख्या आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-5, अंबाजोगाई-3, आष्टी-2, धारुर-1, गेवराई-1, केज-1, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-1, शिरुर-3, वडवणी-0 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली असून आजची कोरोना संशयित चाचणी व बाधितांची संख्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी संख्या आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2 हजार 692 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 41 जणांनी आपले प्राण गमावले आहे. याशिवाय, 2 हजार 716 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 35 हजार 888 रुग्ण सक्रीय आहेत.

आता राज्यातील करोना बाधितांची (Corona Positive) एकूण संख्या 65,59,349 झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत 139207 करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!