आता करुणा यांचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप… पोलीस आयुक्ताकडे केली तक्रार

मुंबईः दि.३- धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडे विरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याची तक्रार केली असून आपल्या फेसबुक पेजवरुन रावणानेही ऐवढे अत्याचार केले नसतील असा आरोप केला आहे. पोलिस (Police) आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत आमरण उपोषणाचा इशाराही करुणा (Karuna) यांनी दिला आहे. करुणा यांची बहिण रेणू शर्मा (Renu Sharma) हिने नुकतीच मुंडे यांच्या वर केलेल्या तक्रारीतून माघार घेतली असून आता करुणा यांच्या तक्रारीने धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा नवीन संकट ओढावले आहे.
करुणा (Karuna) यांनी पोलीस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपवून ठेवल्याचे सांगितले. मला त्यांच्याशी भेटू देत नसल्याचे त्यात नमूद केले आहे. दि. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना (Police) बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी द्या आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी तक्रारीत केली आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा (Renu Sharma) या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे.