बाधितांच्या संख्येत वाढ… बीड जिल्ह्यात आजचे कोरोना रुग्ण.

बीड दि.10 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2765 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 79 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2686 जण निगेटिव्ह आली आहेत. बीड जिल्ह्याची कोरोना बाधितांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. कालची 57 संख्या आज 79 झाली आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-18, अंबाजोगाई-8, आष्टी-33, धारुर-1, गेवराई-5, केज-5, माजलगाव-0, परळी-0, पाटोदा-3, शिरुर-1, वडवणी-5 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी पन्नासच्या आत आलेली संख्या चार दिवसात सतत वाढत आहे. दि.6 (45), दि.7 (38), दि.8 (41), दि.9 (57) तर आज दि.10 रोजी हा आकडा तब्बल 79 वर पोहोचला आहे. उतरलेली संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाकडून सावधनतेचा इशारा दिला जात आहे.

दरम्यान, राज्यात गुरुवारी 4,219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 538 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 95 हजार 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे.

राज्यात गुरुवारी 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 229 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 758 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!