बीड जिल्ह्यात आजचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.11 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2368 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 55 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2313 जण निगेटिव्ह आली आहेत. बीड जिल्ह्याची कोरोना बाधितांची कमी झालेली संख्या पुन्हा वाढ होत आहे. आज संशयित रुग्णांची तपासणी संख्या कमी असल्याने कालपेक्षा बाधितांची कमी झाली आहे.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-4, अंबाजोगाई-5, आष्टी-19, धारुर-4, गेवराई-2, केज-9, माजलगाव-2, परळी-2, पाटोदा-3, शिरुर-1, वडवणी-4 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आज 55 आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी पन्नासच्या आत आलेली संख्या चार दिवसात सतत वाढत आहे. दि.6 (45), दि.7 (38), दि.8 (41), दि.9 (57) दि.10 रोजी हा आकडा तब्बल 79 वर होता. आज सणासूदीमुळे संशयित रुग्णांची तपासणी कमी आहे. तरी आज बाधितांची संख्या 55 वर पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी थोडी घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील काही प्रमाणात वाढली आहे. राज्यात 4 हजार 154 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 4 हजार 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 62 लाख 99 हजार 760 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.05 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 44 कोरोना बाधित (Corona positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.