चार तालुके निरंक… बीड जिल्ह्यात आजचे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.13 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2035 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 48 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 1987 जण निगेटिव्ह आली आहेत.  आज संशयित रुग्णांची तपासणी संख्या कमी असल्याने  बाधितांची संंख्या समाधानकारक  आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-0, आष्टी-31, धारुर-0, गेवराई-0, केज-3, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-1, शिरुर-0, वडवणी-2 अशी आहे.

बीड जिल्ह्यात आज कोरोना बाधितांची संख्या समाधानकारक आहे. सणासुदीच्या काळात संशयित रुग्णांची तपासणी कमी असून राज्यात आगामी काळात रुग्ण संख्या वाढीचा धोका व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज्यभरात दिवसभरात 3 हजार 623 नवीन करोना बाधित (Corona Positive) आढळून आले असून, 2 हजार 972 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, 46 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही.

राज्यात आजपर्यंत एकूण 63,05,788 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.04 टक्‍के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 64,97,877 झाली आहे. राज्यात आजपर्यंत 138142 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्‍के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,59,79,898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,97,877(11.61 टक्‍के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!