ऐन सणासुदीत बीड जिल्ह्यात मंगळवारी आढळले ऐवढे कोरोना रुग्ण; पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.14 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2263 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 61 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2202 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-10, अंबाजोगाई-12, आष्टी-9, धारुर-1, गेवराई-2, केज-5, माजलगाव-2, परळी-1, पाटोदा-4, शिरुर-2, वडवणी-13 अशी आहे.
बीड जिल्ह्यात आज कोरोना बाधितांची संख्येत आज वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात संशयित रुग्णांची तपासणी कमी झाली तशी बाधितांची आकडेवारीही आवाक्यात दिसत आहे. काल असलेली 48 संख्या आज 61 झाली आहे.
दरम्यान, राज्यात सोमवारी दिवसभरात ३ हजार २३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, २ हजार ७४० नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. याशिवाय, २७ कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही.
राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०९,०२१ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या ६५,००,६१७ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३८१६९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.