कोरोंना विशेष

जिल्ह्याची आजची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर…पहा तालुका निहाय आकडेवारी…

बीडः-5 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 820 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 95 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 725 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक 38 कोरोना पॉझिटीव्ह बीड तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

(Today’s number of districts is on the threshold of a century … see taluka wise statistics …)

1. बीड- 38                7.माजलगाव-6
2. अंबाजोगाई-7          8.परळी-14
3. आष्टी-9                  9.पाटोदा-1
4. धारुर-0                10.शिरुर-7
5. गेवराई-9              11.वडवणी-3
6. केज-1

वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.5 शुक्रवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणी तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना (corona) संशयितांच्या चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात आज सर्वाधिक 95 रुग्ण संख्या आढळून आली आहे. यात एकट्या बीड तालुक्यात आजची सर्वाधिक 38 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. परळीतही रुग्ण संख्या वाढलेली दिसुन येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!