अंबेवडगावात पुन्हा एक पॉझिटीव्ह
जिल्ह्यात दोन नवीन रुग्णांची भर

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) तालुक्यातील आंबेवडगाव येथील दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या दोन पैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्ह्यातील आजच्या २३ पैकी दोन जनांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे नवीन दोन रुग्णांची भर पडली असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
दि.४ रोजी आंबेवडगाव येथील ६५ वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर दुसऱ्या दिवशी सदरील इसमाच्या दोन सुनांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच कुटुंबातील आज दुसऱ्यांदा पाठवलेल्या दोन पैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सदरील बाधित रुग्ण अकरा वर्षीय शालेय विद्यार्थी असुन मुळ बाधिताचा नातू असल्याचे कळते. यामुळे आंबेवडगावच्या बाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे. आज जिल्ह्यातून २३ स्वॕब नमुने पाठवण्यात आली होती. यापैकी धारुर व गेवराई तालुक्यातील प्रत्येकी एक अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती मिळाली.