नवी मुंबई महानगरपालिका सभापती सुरेश कुलकर्णी यांचा धारुरमध्ये सत्कार

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) नवी मुंबई महानगरपालिकेचे सभापती व शिवसेनेचे नेते सुरेश कुलकर्णी यांनी आज दि.१३ रविवार रोजी धारुर शहरास भेट दिली असुन यावेळी त्यांचा राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर (Sayyad Shaker) यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

शहरातील डिस्कव्हरी कॉम्प्यूटर्स (Discovery Computers) येथे नवी मुंबई महानगरपालिका सभापती व शिवसेनेचे (Shivsena) नेते सुरेश कुलकर्णी (Suresh Kulkarni) यांनी भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेरअली (Sayyad Shaker) यांच्याशी विविध विषयावर चर्चा करुन सोनपेठकडे रवाना झाले. यावेळी नवी मुंबई बंजारा समाज जिल्हा अध्यक्ष गुलाब भिडे, समाजसेवक के.आर. वाघमारे, शिवसेना शाखा प्रमुख बसु पवार, तुर्भे शिवसेना (Shivsena) शाखा प्रमुख तय्यब पटेल उपस्थित होते. श्री.कुलकर्णी (Suresh Kulkarni) यांनी लॉकडाऊन काळात नवी मुंबईत गोरगरीब कुटूंब, परप्रांतिय मजुरांना मदत कार्य करण्याचे उत्कृष्ट कार्य केले. डिस्कव्हरी कॉम्प्यूटर्स (Discovery Computers) येथे उपस्थितांचा शाल, हार व श्रीफळ देवून यथोचित सत्कार निवृत्त ना. सुभेदार सय्यद इस्माईल, न.प.चे माजी उपाध्यक्ष आवेज कुरेशी, माजी सभापती सय्यद हारुण, सय्यद जफर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सय्यद अखिल, सय्यद सद्दाम, सय्यद सोहेल, शोयेब तांबोली आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!