आजच्या पॉझिटीव्ह संख्येने ५०० पार…. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) धारुर तालुक्यातील कोरोना (Corona) बाधितांची संख्या आज ५०० झाली असुन तालुक्यात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची आजची संख्या ५ असून काल पाठवलेली ३ स्वॅब (swab) पैकी २ निगेटिव्ह तर एक पॉझिटीव्ह आला आहे. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून ॲन्टीजन तपासणीची संख्या कमी झाल्याने बाधितांचा वेग मंदावला असल्याचे चित्र दिसत आहे.
आज तालूक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५०० झाली आहे. यात आज ॲन्टीजन व स्वॅब तपासणीत आढळून आलेल्या ५ पॉझिटीव्ह रुग्णाचा समावेश आहे. ३२ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ४ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या तीन स्वॅब नमुन्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज आढळून आलेल्या ॲन्टीजन (Anigen) चाचणीत शहरातील संख्या तीन, ग्रामीणचा एक तर स्वॅब (swab) नमुन्यात ग्रामीण भागातील चोंडी येथील एकाचा समावेश आहे.
ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह
१. ६० वर्षीय पुरुष, कटघरपुरा, धारुर
२. १८ वर्षीय पुरुष, उदयनगर, धारुर.
३. १४ वर्षीय पुरुष, केज रोड, धारुर
४. ७२ वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर
स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह
५. ३३ वर्षीय पुरुष, चोंडी, ता.धारुर
यांचा समावेश आहे.