बीड जिल्ह्याचे आजचे अपडेट; धारुर 60 तर केज 134, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.18 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4401 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1186 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3215 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s update of Beed district; Dharur 60 and Kaij 134, see taluka wise statistics.)

आज बीड तालुक्यात 284 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात बीड पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 81 व आष्टी तालुक्यात 89 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 60 तर केजमध्ये 134 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, आष्टी नंतर केज व गेवराईत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-284, अंबाजोगाई-81, आष्टी-89, धारुर-60, गेवराई-119, केज-134, माजलगाव-67, परळी-44, पाटोदा-220, शिरुर-63, वडवणी-25 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या 10 जिल्ह्यात बीडचा समावेश आहे. आज नऊ राज्यातील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

राज्याची स्थिती….
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. आज तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर आज नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला.

आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 54,05,068 इतका झाला असून 48,74,582 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 82 हजार 486 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!