तेलगाव येथे महिलेला ट्रकने चिरडले… हृदयद्रावक घटना

किल्लेधारूर दि.11 मार्च – तेलगाव येथे बीड परळी रस्त्यावर आज दि.11 गुरुवार रोजी दुपारी धारुर तालुक्यातील कासारी बोडखा येथील महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात महिलेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मनहेलावून टाकणारा अपघात (Accident) घडला आहे. घटनेची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आली आहे.
(Woman crushed by truck in Telgaon … heartbreaking incident)
याबाबत मिळालेल्या माहितीवरुन, धारुर तालुक्यातील तेलगाव हे चौफाळ्याचे ठिकाण परिसरातील काही गावासाठी बाजरपेठेचे ठिकाण आहे. येथून जवळच असलेल्या कासारी बोडखा येथील गावकरी नेहमीच तेलगाव येथे खरेदीसाठी येत असतात. आज गुरुवारी बोडखा येथील लक्ष्मण तिडके आपल्या पत्नी रत्नमाला (35) यांच्यासह तेलगावला आले होते.
बीड परळी रस्त्यावर विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एका मालवाहू ट्रकने (क्र. एमएच 40 – एके 1191) त्यांच्या दुचाकीस मागुन धडक दिल्याने खाली पडलेला त्यांच्या पत्नी ट्रकच्या मागील टायर खाली पडल्या. दहा टायर असलेल्या ट्रकची चाके महिलेच्या अंगावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी हृदयद्रावक दृश्य दिसुन आले. सदरील घटना ३.३० ते ४ वाजे दरम्यान घडली. अपघात (Accident) होताच ट्रक चालक फरार झाला असून क्लिनरला लोकांनी पकडले आहे. घटनेची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आली आहे.