दुर्दैवी घटना… खदाणीत बुडून दोन बालकांचा मृत्यू; केज तालुका हळहळला.

केज दि.8 अॉक्टोंबर – केज (Kaij) तालुक्यातील साळेगाव शिवारातील दस्तगिर माळ भागातील खदाणीत बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.8) चारच्या सुमारास निदर्शनास आली आहे.
(Tragic incident … Two children drown in mine; The Kaij taluka was shaken.)
अनिल बबन शिंदे व प्रकाश बबन शिंदे (रा.चिंचोली माळी) असे बुडून मृत्यू पावलेल्या दहा वर्षाच्या आतील दोघा भावंडांची नावे आहेत. सदरील बालके नेमके त्या ठिकाणी का गेले होते ? घटना नेमकी कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे (Tragic incident) केज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान सदरील घटनेची माहिती होताच केज पोलीस (Police) ठाण्याचे पीएसआय (PSI) दादासाहेब सिद्धे, प्रमोद यादव, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, अशोक नामदास, धन्यपाल लोखंडे, शिवाजी शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खदाणीतून बालकांचे मृतदेह (Dead Body) बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.