ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात… चार जागीच ठार तर 25 जण जखमी.

हिंगोली दि.29 डिसेंबर – मराठवाड्यातील हिंगोली येथे एक प्रवासी ट्रॅव्हल्स आणि ट्रकची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात अनेक 4 जणांचा मृत्यू तर 20 ते 25 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Travels and truck crash … Four killed, 25 injured.)

काही दिवसांपूर्वीच लातूर (Latur) येथे झालेल्या भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता. हिंगोली (Hingoli) येथे आज एक भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की चार जण जागीच मृत झाले आहेत. तर मृत्यूचा (Death) आकडा वाढण्याची संशय व्यक्त केला जातो आहे. एक प्रवासी ट्रॅव्हल्स आणि ट्रकची एकमेकांना धडक बसून हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की ट्रक (Truck) आणि ट्रॅव्हल्स (Travels Bus) दोन्हीही रस्ता सोडून शेतात घुसल्याचं पाहायला मिळालं आहे.

नांदेड-हिंगोली मार्गावरील कळमनुरी तालुक्यातील पार्डीमोड शिवारात हा अपघात झाला
या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींवर काळानं घाला घातला आहे. नांदेड-हिंगोली मार्गावरील (Hingoli-Nanded Route) कळमनुरी तालुक्यातील पार्डीमोड  शिवारात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृतदेह ट्रकच्या चाकामध्ये अडकल्याचं चित्रही पाहायला मिळालं त्याचबरोबर अनेक प्रवाशी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही. मात्र अपघातानंतर काही जण हे चक्क ट्रकच्या खालच्या बाजूला अडकल्याचं दिसून आलं आहे.

सध्या या अपघाताचा पंचनामा पोलिसांकडून केला जातो आहे. तर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. लवकरच या अपघातातील मृतांचा एकूण आकडा स्पष्ट होईल. तर या अपघात झालेल्या ठिकाणी बचावकार्य केलं जात आहे. ट्रकच्या खाली अडकून पडलेल्या या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्यात आले.

याशिवाय एक महिला या अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ झाली होती. या भीषण अपघातात दोन ते तीन महिला जागीच दगावल्या असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तर एक प्रवासी अपघातात मार लागून थेट ट्रकच्या खाली अडकला गेला. या प्रवाशाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदत केली असल्याचं देखील पहायला मिळाल आहे.

अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच जखमींना उपचारासाठी कळमनुरी आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस (Police) प्रशासन आणि आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. घटनास्थळी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. क्रेन व जेसीबीच्या साह्याने ट्रकला हलविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे हिंगोली ते नांदेड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!