केज जवळ ट्रॅक्टर मोटारसायकलचा तिहेरी अपघात….

केज दि.१(प्रतिनिधी) – केज पासून अवघ्या दोन किमी अंतरावर केज कळंब रोडवर ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकल असा तिहेरी अपघात (Accident) झाला असून यात दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना केज (Kaij) उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन गंभीर जखमीला अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.
सोमवारी दि.१ रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास केज (Kaij) कळंब (Kalamb) रोडवर डिस्कव्हर आणि होंडा शाईन या दोन मोटारसायकल आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात (Accident) झाला. त्यात मोटारसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी विजय चंद्रसेन जाधव रा.गांजी यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला नेण्यात आले आहे. तर अन्य जखमी कळंब (Kalamb) येथील गणेश बंडू खैरमोडे नामक तरुण असल्याचे समजते.