तृप्ती देसाई परळीत पुजा चव्हाण कुटूंबियाच्या भेटीला….केली सीबीआई चौकशीची मागणी

परळी दि.२०(वार्ताहर): भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी दि.२० शनिवारी दुपारी पुजा चव्हाण हिच्या वसंतनगर तांड्यावरील घरी भेट दिली. पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. दोन दिवसांपुर्वी श्रीमती देसाई यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती.

राज्यात चर्चेत असलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला (Pooja Chavan suicide case) दोन आठवडे झाले तरी अजून गुन्हा दाखल झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी दोघांना अटक केल्याची चर्चा आहे. तालुक्यातील वसंतनगर तांड्यावरील पुजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या घरी शनिवारी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी तिचे वडील लहू चव्हाण यांची भेट घेत विचारपूस केली व त्यांचे सांत्वन केले.

यावेळी बोलताना तृप्ती देसाई यांनी पुजाला न्याय मिळाला पाहिजे, राज्याचा मंत्री असा एवढे दिवस गायब कसा होवू शकतो. पुजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे व पुजाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे. पुजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी लढणार असल्याचे श्रीमती देसाई यांनी यावेळी सांगितले.

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळी येथील वसंतनगर तांड्यावर तिच्या आई-वडीलां सोबत राहत होती. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. ती टीकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय होती. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. दि.७ फेब्रुवारी रविवारी तिने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. गेली दोन आठवडे हा विषय सतत चर्चेत आहे.
(Pooja Chavan suicide case)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!