चिंताजनक मंगळवार… बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा काय आहे आजची परिस्थिती.

बीड दि.20 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात काल रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट दिसून आली. मात्र आज अलिकडची सर्वाधिक संख्या आल्याने चिंता वाढली आहे.  आज मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे 3579 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 211 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3368 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Tuesday corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-36, अंबाजोगाई-10, आष्टी-43, धारुर-5, गेवराई-14, केज-10, माजलगाव-5, परळी-1, पाटोदा-28, शिरुर-42, वडवणी-17 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत असताना काल दिलासा मिळाला. जिल्हा प्रशासनाने आष्टी, गेवराई व पाटोदा या तालुक्यात काल पासून निर्बंध कडक केली असली तरी अंमलबजावणी बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज शिरुर व वडवणीसह जिल्ह्याची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन बाबतही अशीच परिस्थिती असून लोकांकडून निर्बंध पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राज्यात सोमवारी दिवसभरात राज्यात 06 हजार 017 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 13 हजार 051 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात 66 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 59,93,401 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 96 टक्के एवढा झालं आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून आलं होतं. सोमवारी दिवसभरात पुण्यातुनही मोठ्या प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!