BEED24

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर; असा पहा निकाल.

मुंबई दि.7 जुन – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यातील बारावी परीक्षांचा निकाल आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या दि.8 बुधवारी लागणार (Result) आहे.

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा (Twelfth) निकाल लागणार आहे.  दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in व mahresult.nic.in वर बघायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे.  निकाल ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटवर दिसत असला तरी क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात.

काही दिवसांत इतर अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणे आवश्यक आहे. सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. 

निकालानंतर ‘ही’ कागपत्रं असतील आवश्यक 
गुणपत्रिका (Board Marksheet) स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate) उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) आधार कार्ड (Aadhar card) जातीचा दाखला (Caste Certificate) रहिवासी दाखला (Address Proof) पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

( Twelfth result date announced; Here is the result. )

Exit mobile version