बीड जिल्ह्यात सोमवारीही आढळले अडिचशे रुग्ण; अंबाजोगाईत अर्धशतक तर धारुरमध्ये 4… माजलगाव व गेवराईची चिंता वाढली.

बीड दि.15 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2483 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 248 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2235 जण निगेटिव्ह आली आहेत. आज तेराव्या दिवशी बीड तालुक्यात 115 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 50, माजलगाव 27 तर गेवराईत 15 व केज तालुक्यात 11 रुग्ण आढळून आली आहेत. आज धारुरमध्ये 4 कोरोना बाधित आढळली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(Two hundred and fifty patients were also found in Beed district on Monday; Half a century in Ambajogai and 4 in Dharur … Majalgaon and Gevrai worries increased.)
1. बीड- 115 7.माजलगाव-27
2. अंबाजोगाई-50 8.परळी-6
3. आष्टी-9 9.पाटोदा-5
4. धारुर-4 10.शिरुर-3
5. गेवराई- 15 11.वडवणी-3
6. केज-11
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.15 सोमवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 248 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या पाच ते सहा दिवसांत झपाट्याने वाढत आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाने आज पुन्हा 16 हजारचा आकडा ओलांडला आहे. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्याने आदेशानुसार रात्रीची संचारबंदी सुरु झाली आहे. आज आलेल्या अहवालाची संख्या काल पेक्षा कमी असून व्यापाऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.