आठवडे बाजारात टेम्पो घुसून दोघे ठार तर 16 जखमी, चार दुकानांचे नुकसान.

नांदेड दि.17 अॉगस्ट – नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार (Kandhar ) इथल्या आठवडे बाजारात सोमवारी रात्री (16 ऑगस्ट) ब्रेक फेल (Break failed) झालेला टेम्पो घुसल्याचा अपघात घडला. या अपघातात एक दाम्पत्य जागीच ठार झाले. तर, इतर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत.

(Two killed, 16 injured, four shops damaged.)

आठवडी बाजारा टेम्पो (Tempo) भरधाव वेगाने घुसल्याने ही घटना घडली. अपघातानंतर पुढे आलेली दृष्य अनेकांचे लक्ष विचलित करणारी आहेत. कंधार येथील महाराणा चौकात आलेल्या अवजड टेम्पोचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात (Accident) घडला. हा टेम्पो चौकातील एका टिन पत्र्याच्या दुकानात घुसला आण उलटला. डेम्पोची धडक बसल्याने गोविंद भंगारे (वय 65 वर्ष) आणि मथुरा भंगारे (वय 55 वर्ष) हे पती-पत्नी दाम्पत्य जागीच ठार झाले. तर, इतर 16 जण जखमी झाले.

कंधारमध्ये प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार असतो. हा बाजार महाराणा प्रताप चौकात भरतो. कंधार (Kandhar) आणि परिसरातील नागरिक या बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. सहाजिकच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. अशा गर्दीच्या ठिकाणी हा अपघात घडला आहे. टेम्पोची धडक बसल्याने इथल्या चार दुकानांचेही मोठे नुकसान झाले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ आणि काही छायाचित्रे सोशल माध्यमातून (Social media) मधून व्हायरल झाली आहेत.

अपघातातील जखमींवर कंधार येथीलच उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, गंभीर जखमी असलेल्या चौघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हालविण्यात आले आहे. कंधार येथे घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत विविध चर्चा आणि तर्कवितर्कांना परिसरात उत आला आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरु केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!