नवोदीत कलाकाराने साकारले कै. द्वारकादास लोहीया यांचे अर्धाकृती शिल्प….

किल्लेधारूर दि.२३ (वार्ताहर) मानवलोकचे Manavlok संस्थापक समाजसेवक स्व.द्वारकादास लोहीया Dwarkadas Lohiya यांचा अर्धाकृती शिल्प धारूर येथील नवोदीत शिल्पकार सुधिर उमाप Sudhir Umap यांने हूबेहूब बनवलेले शिल्प मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहीया Aniket Lohiya यांच्या सपूर्द केले. यावेळी अनिकेत लोहिया यांनी उमाप यांच्या कलाकृतीचे कौतूक केले.
महाराष्ट्र भरात आपल्या उत्कृष्ट कार्यातून मानवलोकची Manavlok वेगळी छाप निर्माण करणारे संस्थापक स्व.द्वारकादास लोहीया Dwarkadas Lohiya यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी त्यांचे कार्याने प्रेरीत होऊन येथील तरूण नवोदीत शिल्पकार सुधिर उमाप Sudhir Umap यांने स्वतंत्र पणे पहिले काम हातात घेतले. आपल्या शिल्पकलेची सुरूवात समाजासाठी जिवनभर काम करणारे स्व द्वारकादासजी लोहीया यांचे अर्धाकृती पुतळा बनवून करण्याचे ठरवले. त्यांने दोन महिन्या पुर्वी हे शिल्प बनवण्यास सुरूवात केली. तो मानवलोकला भेट देण्याचा त्यांचा निश्चय होता. स्व. द्वारकादासजी लोहीया यांच्या स्मृती दिना निमीत्त मानवलोकचे कार्यावाहक अनिकेतजी लोहीया यांचे कडे हे शिल्प सपूर्द केले. मातीपासून तयार करून फायबरचा उत्कृष्ट कोट देऊन आकर्षक व हुबेहुब हा पुतळा सुधिर उमाप यांनी सर्वांचे मार्गदर्शन घेऊन बनवला आहे. हुबेहूब अशी प्रतीकृती पाहून मानवलोकचे कार्यवाहक अनिकेत लोहीया Aniket Lohiya यांनी नवोदीत शिल्पकार सुधिर उमाप यांचे कौतूक केले आहे. यावेळी पञकार अनिल महाजन, संदीपान तोंडे, राम शेळके, अतुल शिनगारे, नाथा ढगे, ईश्वर खामकर, जलमिञ विजय शिनगारे, आकाश गायकवाड, शेख इरफान, लखन सिरसट हे उपस्थित होते.