कोरोंना विशेष

महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे दोन नवीन स्ट्रेन…

नवी दिल्लीः दि.२४- भारतात कोरोनाचे दोन नवीन प्रकार सापडले आहेत. केंद्र सरकारने याची समिती स्थापन केली होती. या समितीने भारतातील ३५०० नमुन्यांची पाहणी केली. यात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ब्राझिलनंतर चौथा व पाचवा प्रकारचा नवीन कोरोना स्ट्रेन भारतातील महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आढळून आला असल्याची पूष्टी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

(Two new corona strains found in Maharashtra …)

इंग्लंड व्हेरियंट्सच्या सुमारे १८७ घटना आढळल्या आहेत. दुसरे म्हणजे, दक्षिण आफ्रिकामध्ये ६ लोकांमध्ये व्हेरिएंट इन्फेक्शन झाले आहे. तिसरा ब्राझिलमध्ये एक नवा प्रकार आढळून आला आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रात चौथ्या आणि पाचव्या अशा दोन नवीन स्ट्रेनची (New Corona Strain) पुष्टी झाली आहे. अशा प्रकारे, आतापर्यंत एकूण नवे पाच स्ट्रेन सापडले आहेत. यातले दोन नवे स्ट्रेन महाराष्ट्रात आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नवीन प्रकाराच्या कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नव्या प्रकारामुळे चिंता वाढली आहे. कोरोना विषाणूच्या संशोधनासाठी केंद्र सरकारने एक समिती बनवली होती. त्या समितीने अहवाल दिला असून त्यातून हे नवे पाच स्ट्रेन आढळून आले आहेत. पहिला स्ट्रेन इंग्लंडमधील, दुसरा दक्षिण आफ्रिकेतील नवा स्ट्रेन (New Corona Strain) भारतात आला आहे. तिसरा स्ट्रेन ब्राझिलमधला असून चौथा आणि पाचवा स्ट्रेन महाराष्ट्रात आढळून आला आहे. दरम्यान, या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याची शक्यता आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!