खून प्रकरणातील इतर दोन आरोपीही पोलिसांच्या ताब्यात; नेकनूर पोलिसांची कामगिरी.

नेकनूर दि.30 जून – मांजरसुंबा घाटात (Manjarsumbha Ghat) मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा अपघात दिसून आला मात्र हा अपघात (Accident) नसून खुनाचा (Murder) प्रकार असल्याचे एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांना जाणवल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपीला मयताच्या दाजीला काही तासात बेड्या ठोकत इतर दोन आरोपींना आज सकाळी ताब्यात घेतले.
(Two other accused in the murder case are also in police custody; Performance of Neknur Police.)

निलेश शहादेव ढास (वय 25) रा. लिंबागणेश असे मयत तरुणाचे नाव असून सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेलेला हा युवक मंगळवारी सकाळी घाटात मयत अवस्थेत आढळला. बुलेट चा अपघात (Accident) झाल्याचे भासविण्यात आले होते.

मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा (Murder) असल्याचे नेकनूर पोलिस स्टेशनचे एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी ओळखले. तातडीने तपासाला गती देत यातील मुख्य आरोपी तथा मयत युवकाचा दाजी तथा मामाचा मुलगा मनोज अंकुश घोडके (वय 30) याला पोलिसांनी (Police) अंत्यविधी होताच ताब्यात घेतले.

यानंतर आज बुधवारी सकाळी यातील उर्वरित आरोपी राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय 21) रा. वांगी, कृष्णा गोपीनाथ डाके (वय 27) रा. काठोडा यांना अटक केली. सहाय्यक पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शरद कदम, खाडे, राख, प्रशांत क्षीरसागर, सानप, नवले यांनी 24 तासात याची उकल केली. यापूर्वीही सहाय्यक पोलिस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी तीन खुनाचे गुन्हे काही तासात उघडकीस आणत आरोपी जेरबंद केले आहेत. पोलिसांच्या तपासकार्याचे कौतूक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!