घात अपघात

बीड जिल्ह्यात घाटात ट्रक पलटी होवून दोघांचा मृत्यू , तर सोलापूर जिल्ह्यात बस पलटी.

49 / 100

बीड दि.24 जुलै – बीड जिल्ह्यात घाटात ट्रक पलटी होवून दोघांचा मृत्यू , तर सोलापूर जिल्ह्यात बस पलटी होवून 35 प्रवासी जखमी झाले आहेत. सोलापूरचा (Solapur)अपघात सकाळी दहा ते अकरा दरम्यान तर बीड (Beed) जिल्ह्यातील अपघात शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडला.

बीड – नगर महामार्गावर (Highway) महेन्द्रवाडीच्या घाटात रेल्वेचे सामान घेऊन जाणारी ट्रक अवघड वळणावर शनिवारी रात्री आठच्या सुमारास पलटी झाल्यामुळे ट्रकमधील निखील दहिफळे (वय 18 वर्षे) रा.खडकवाडी ता.पाटोदा व नानासाहेब सानप (वय 21वर्षे) खडकवाडी ता.पाटोदा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने खडकवाडी येथे शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिस ठाण्याचे पीएसआय (PSI) पतंगे , पोलिस कर्मचारी संभाजी सोळंके , काकडे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली होती.
 
पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या महेंन्द्रवाडीच्या घाटात दौन्ड कडून येणारा ट्रक एम एच 23 डब्लू 2683 हा आला असता ट्रक चालकाला कॉर्नरचा अंदाज न आल्यामुळे सदरिल ट्रक खोल दरीत कोसळला. या ट्रक मधील निखील दहिफळे व नानासाहेब सानप यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झालेला ट्रक हा सावरगाव येथील असल्याचे कळते ट्रक मधील मयत झालेले दोन्ही युवक हे अविवाहीत होते .

सोलापूर – गाणगापूर एसटी बस पलटी
सोलापूर – गाणगापूर एसटी बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात (Accident) झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली. गाणगापूर एसटी बसला (ST Bus) अक्कलकोट जवळ झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

या बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 35 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार चार ते पाच प्रवाशांची प्रकृती ही गंभीर असल्याची देखील माहिती आहे. यातील काही रुग्णांना सोलापूरच्या (Sholapur) शासकीय रुग्णालयात देखील हलविण्यात येत असल्याची माहिती आहे.

( Two people died after a truck overturned in a ghat in Beed district, while a bus overturned in Solapur district. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!