कमी झालेल्या संख्येत आज मोठी वाढ; पहा किती व कोणत्या भागातील आहेत पॉझिटीव्ह रुग्ण

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या २२ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ७ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या ११ स्वॅब (Swab) पैकी १ पॉझिटीव्ह (positive) अशी एकुण ८ रुग्ण आढळली आहेत. गेल्या आठवडाभरातील ही सर्वाधिक संख्या आहे. पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांत तेलगाव येथील ५ जनांचा समावेश आहे.
आठ दिवसांपासून १ किंवा २ पॉझिटीव्ह असणारी संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजन तपासण्यात वाढ झाली. २२ तपासणीत ७ पॉझिटीव्ह आढळली आहेत. काल पाठवलेल्या ११ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी एकाचा पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाला आहे. आज एकुण ८ कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात ३ पुरुष तर ५ स्त्री रुग्णांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसात अत्यंत कमी संख्या होती. आज अचानक संख्या वाढली असुन पॉझिटीव्ह रुग्णांत ग्रामीण भागातील रुग्ण अधिक आहेत. आज १२ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण
१. ५४ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता. धारुर
२. २५ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर
३. ३३ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर
४. ५ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर
५. २८ वर्षीय पुरुष, तेलगाव, ता.धारुर
६. ७० वर्षीय स्त्री, कसबा, धारुर
७. ५० वर्षीय पुरुष, कसबा,धारुर
स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले
८. ६० वर्षीय स्त्री, कोयाळ, ता.धारुर
यांचा समावेश आहे.