जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

बीडः दि.१९(प्रतिनिधी) बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून वर्षपूर्ण करण्यापुर्वीच त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात बीडचे (Beed) जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतलेल्या राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांची आज मुंबईच्या विक्रीकर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर बीडचे जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त असणारे आर.एस. जगताप (R.S. Jagtap) रुजू होणार आहेत. जगताप (R.S. Jagtap) यांनी यापुर्वीही बीड (Beed) येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून रेखावार यांच्या बदलीची चर्चा होती. आज ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता शिथिल होताच त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.