घात-अपघात

दुचांकीची समोरासमोर धडक; धारुर तालुक्यातील घटना.

किल्ले धारूर दि.17 मार्च – आडस-धारुर रस्त्यावर कोळपिंप्री ता.धारुर जवळ एका वळणावर दुचांकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील एकाला डोक्याला मार लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याने लातूरला हलविण्यात आले तर, दुसऱ्या जखमीवर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

( Two-wheeler head-on collision; Incidents in Dharur taluka. )

सदरील अपघात (Accident) बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला आहे. धारुर (Dharur) तालुक्यातील खोडस येथील जितेंद्र नामदेव काटे हा तरुण दुचाकी क्रमांक एम.एच. 44 एम 9867 वरुन धारुर येथून आडसकडे जात होता. तर दुसरा व्यक्ती आडसकडून धारुरला दुचाकी क्रमांक एम.एच. 48 ए यू 4223 वरुन जात होता.

या दोन्ही दुचाकींची कोळपिंप्री ता.धारुर शिवारातील गायरान जवळील वळणावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये जितेंद्र काटे यांना डोक्याला मार लागला असून, इतरही ठिकाणी मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. तर दुसरा व्यक्तीचा पाय तुटल्याचे सांगितले जात आहे.

या दुचाकीस्वाराचे नाव समजु शकले नाही परंतु तो धारुर तालुक्यातील चाटगावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु जितेंद्र काटेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर (Latur) येथे हलविण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!