धारुरचे युवक उद्योजक सुनिल फावडे यांचे निधन.

किल्ले धारूर दि.1 जून – धारुर शहरातील उद्योन्मुख युवक उद्योजक सुनिल गणेश फावडे (वय 35) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना अकाली निधन आल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील गायकवाड गल्लीतील रहिवासी सुनिल गणेशराव फावडे उर्फ बबलू हे अतिशय शांत, हसतमुख स्वभावाचे होते. तरुण वयात त्यांनी शेतीसह श्रीसाई ॲक्वा पाणी उद्योग उभारुन व्यवसाय क्षेत्रात आघाडी मिळवली. गेल्या काही महिन्यापुर्वी त्यांना आजाराने ग्रासल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक त्रास वाढल्यामुळे उपचारापुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. प्रभाकर फावडे यांचे ते धाकटे बंधू होत. तरुण वयात फावडे कुटूंबियांवर ओढावलेल्या दुखद प्रसंगामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सितेची न्हानी परिसरातील स्मशानभुमीत बुधवार दि.1 जून सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
( Sunil Fawde, a young entrepreneur from Dharur, passed away. )