धनंजय मुंडे यांनीही राजीनामा द्यावा; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं विधान

मुंबई : दि.१ मार्च- मुंबईत पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी बोलताना, आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत आहे असा नाराजीचा सूर आवळला. त्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan suicide Case) बोलत होत्या. पुढे बोलताना धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा असे त्या म्हणाल्या.

(Dhananjay Munde should also resign; Statement of BJP leader Pankaja Munde)

वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide Case) तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं म्हणत जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य आणि अपेक्षित त्या मार्गानं होण्यासाठी त्या आग्रही दिसल्या. सोबतच सदर प्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणली गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.

पूजा चव्हाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राज्यातील वनमंत्रीपदी असणाऱ्या संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resignation) दिला. ज्या धर्तीवर आता रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीही पंकजा मुंडे यांनी उचलून धरल्याचं पाहायला मिळालं.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता याची चौकशी व्हावी आणि पूजाला न्याय मिळावा अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडली. संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी फार आधी पदाचा राजीनामा (resignation) देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही असं म्हणत चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातला गेलाच पाहिजे हीच बाब त्यांनी उचलून धरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!