Unethical Human Trafficking धारुर तालुक्यातील फरार जोडप्याचा शोध लागला ; सुरेखा धस यांची कामगिरी.

किल्लेधारुर दि.21 जुलै – धारुर Dharur तालुक्यातील तांदळवाडी येथील फरार अल्पवयीन मुलगी व तरुणाचा बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक ( Unethical Human Trafficking ) कक्षाच्या प्रमुख स.पो. नि. सुरेखा धस यांच्या पथकाने शोध लावला असून यातील आरोपी तरुणास आज धारुर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी तरुणास तीन दिवसांची पोलिस कस्टडी Police custody सुनावली आहे. (Unethical Human Trafficking… Absconding couple traced from Dharur taluka; Performance by Surekha Dhas.)
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जवळजवळ आठ महिन्यापुर्वी धारुर तालुक्यातील तांदळवाडी येथून एका अल्पवयीन मुलीस तरुणाने फुस लावून पळवले होते. याचा तपास बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक (Unethical Human Trafficking) शाखेकडे देण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी या प्रकरणाचा छडा लावला. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर पोलिस स्टेशन हद्दीतील खेड येथील एका वस्तीवर सदर जोडपे असल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी तरुणावर पोक्सोसह भादवि 363, 370 नूसार धारुर Dharur पोलिसात गुन्हा नोंद आहे. या आरोपीस आज दि.21 शुक्रवार रोजी पोलिस उपनिरिक्षक गोविंद बास्टे यांनी धारुर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी Police custody सुनावली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने 7 महिन्यात 10 अल्पवयीन मुलींचा शोध घेतला आहे. तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक अड्यावर छापा मारून अनेक पिडित महिलांची सुटका केली आहे. यामुळे या कक्षाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, वाळके, हे.कॉ. राऊत, बहिरवाल, विकास नेवडे यांचे अभिनंदन होत आहे. हि कामगिरी बीड पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर, स. पोलिस अधीक्षक पंकज कुमावत , उप विभागीय पोलिस अधिक्षक वाळके यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली.