धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ ८ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात ३ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेली १२ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आजची पॉझिटीव्ह (Positive) संख्या ३ आहे.
काल ॲन्टीजन तपासण्यात व स्वॅब (Swab) नमुन्यात अचानक ८ पॉझिटीव्ह आढळली होती. आज पुन्हा पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची संख्या कमी झाली. आज केवळ ८ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात ३ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर कालची १२ स्वॅब (Swab) नमुने निगेटिव्ह आली आहेत. आज केवळ ३ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असून आज १६ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. २० वर्षीय स्त्री, तेलगाव, ता. धारुर
२. १ वर्षीय स्त्री, तेलगाव, ता. धारुर
३. १८ वर्षीय स्त्री, कसबा, धारुर
यांचा समावेश आहे.