BEED24

दुर्दैवी घटना… तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा गळफास; अपघातात शाळकरी मुलगा ठार.

लोहा दि.4 जुलै – लोहा तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून एका 42 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्यानंतर खळबळ माजली आहे. तहसील कार्यालयाच्या इमारतीवर दोरीने लटकलेला त्याचा मृतदेह दिसत होता. तर दुसऱ्या एका घटनेत टिप्परच्या धडकेत देगलूर येथे शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली.

(Unfortunate incident … farmer strangled in tehsil office; Schoolboy killed in accident.)

दि.3 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास लोहा येथील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून पहिल्या मजल्यावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. लोहाचे पोलीस निरिक्षक (Police Inspector) संतोष तांबे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरीत घटनास्थळी पोहचले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमरा तालुका लोहा येथील रहिवासी भिमराव चंपती शिरसाट (42) यांनी स्वत:ची मान दोरीमध्ये लटकवून तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून लटकवून घेतले आहे. याबाबत पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. मृतदेह पहिल्या मजल्याच्या छज्जापर्यंत लटकलेला दिसत होता. सदरील आत्महत्या (suicide) का व कशामुळे झाली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पोलिस निरिक्षक (Police Inspector) संतोष तांबे यांनी सांगितले. सदरील घटनेमुळे लोहा शहरात खळबळ माजली.

टिप्परच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू ….
देगलूर – एक शाळकरी मुलगा शालेय साहित्य घेऊन सायकलवर घराकडे जात असताना समोरून भरधाव वेगात असलेल्या टिप्परने जोराची धडक दिल्याने त्या धडकेत सायकल स्वार मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Accident) दि. 3 जुलै रोजी दुपारी तीन वाजता देगलूर शहरातील संतोष बार जवळ घडली.

तालुक्यातील हंगरगा येथील हल्ली मुक्काम देगलूर येथील रहिवासी ओमप्रकाश रघुपेरवार हंगरगेकर यांचा 14 वर्षीय मुलगा समर्थ ओमप्रकाश रघुपेरवार हा दि.3 जून रोजी दुपारी शालेय साहित्य खरेदी करून बाजारातून घराकडे सायकलवर जात असताना संतोष बार जवळ असलेल्या बावलगावकर देसाई यांच्या घरासमोर पुढून येत असलेल्या एका भरधाव टिप्परने (क्रमांक नसलेल्या) त्या सायकलस्वरास जोराची धडक दिली.

या अपघातात (Accident) समर्थ याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तात्काळ पोलीस (Police) दाखल होऊन मयत मुलाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळावरून टिप्पर चालक व टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. समर्थ रघुपेरवार हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version