दुर्दैवी … पिता पुत्रांचा विहिरीत बुडून मृत्यू; परळीतील घटना.


परळी दि.14 मे – परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे विहिरीतील पाणी काढताना तोल जाऊन पडल्याने बुडत असलेल्या वडीलांना वाचविण्यासाठी मुलाने विहिरीत उडी घेतली. परंतु बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी साडेसहाच्या वाजण्याच्या सुमारास घडली.
शेख सादेक, शेख रफीक रा. बरकत नगर, परळी असे मयत बाप-लेकाचे नाव आहे. शेख सादेक हे आपल्या कुटुंबासह दादाहरी वडगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान शेतात गेल्यानंतर विहिरीतील पाणी काढताना तोल गेल्याने सादेख हे विहिरीत पडले. ते बुडत असल्याचे पाहून जवळच असलेला मुलगा रफीक याने वडीलांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली परंतु तोही पाण्यात बुडाला.
वडील आणि भाऊ बुडत असल्याने दोघांना वाचविण्यासाठी दुसरा मुलगा साजिद हा विहिरीत उतरल्याने तो ही बुडत होता. परंतु आईने बाजुलाच पडलेलं दोर टाकला, त्यास पकडून तो वर आल्याने वाचला. परंतु या घटनेत दोघा बाप-लेकांचा मृत्यू झाला. या घटनेने बरकत नगर व दादाहरी वडगाव या दोन्ही ठिकाणी शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पाणी आणण्यासाठी गेलेले बाप-लेक विहिरीत बुडाल्याची बातमी गावात समजताच दादाहरी वडगावात येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
( Unfortunately … father and son drowned in a well; Incidents in Parli. )