तीन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू; तिघे होते आपापल्या क्षेत्रात नामवंत.

पुणे दि.25 एप्रिल – कोरोनाने नुकतेच एक अख्खं कुटुंबच हिरावल्याची घटना पुण्यात घडली. याच पुण्यात आणखी एक घटना समोर आली आहे. सदाशिव पेठेतील जुन्या पिढीतील नामवंत रहिवासी असलेल्या तीन सख्ख्या भावांचे बारा दिवसांत कोरोनाने निधन (Corona died) झाले. प्रसिद्ध सराफ (The famous seraphim) विश्वनाथ, ज्येष्ठ अभियंता (Engineer) अरविंद आणि ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) डॉ. रमेश नीलकंठ गोडबोले अशी या भावंडांची नावे आहेत. या घटनेने गोडबोले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
(Three brothers die of corona; The three were renowned in their respective fields.)
प्रसिद्ध सराफ (The famous seraphim) विश्वनाथ तथा दादा गोडबोले यांचे दि.17 एप्रिल रोजी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. वडिलोपार्जित सोने-चांदी सराफी व्यवसाय करताना सचोटी, खरेपणा, पारदर्शकता ही मूल्ये त्यांनी कायम जपली. 1968 मध्ये सोने नियंत्रण कायद्यामुळे काही काळ त्यांनी सराफी दुकान बंद ठेवले आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. याच काळात ते सीएआयआयबी आणि एआयबी या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च परीक्षा प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वसुधा, मुलगा डॉ. रघुनाथ, मुलगी विनया बापट तसेच सून, जावई, नातवंडं, पतवंडे असा परिवार आहे.
तर ज्येष्ठ पिढीतील इंजिनियर (Engineer) अरविंद गोडबोले यांचे दि. 12 एप्रिल रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.ई. (मेकॅनिकल) ही पदवी घेतली. नंतर जर्मन सरकारची शिष्यवृत्ती मिळवत तेथे शिक्षण घेतले. मातृभूमीच्या ओढीने भारतात परत आले व त्यांनी 32 वर्षे किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी केली. सोबतच पुणे विद्यापीठात त्यांनी 20 वर्षे जर्मन भाषेचे अध्यापन केले. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. अनिता आपटे, मुलगा सुजय असा परिवार आहे.
तिसरे भाऊ ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) डॉ. रमेश गोडबोले यांचे दि.23 एप्रिल रोजी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांनी बी.जे.मेडिकल महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. गेली 55 वर्षे ते अलका टॉकीज शेजारील डॉ. गोडबोले लॅबोरेटरीचे संचालक राहिले आहेत. त्यांनी 30 वर्षे मधुमित्र या मासिकाचे संपादक म्हणून काम केले. ते निसर्गसेवक या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते. स्मृतीवन व स्मृती उद्यान हे दोन वनीकरण प्रकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दोन्ही मुले व मुलगी त्यांची लॅबोरेटरीचे कामकाज बघत आहेत.
काही दिवसांपुर्वीच पुण्यात एका जाधव कुटूंबातील पाच सदस्य कोरोनामुळे मृत्यू (Corona died) पावल्याची घटना घडली होती. अनेक कुटूंबाचे आधार कोरोनामुळे हिरावले जात आहेत. मराठवाड्यातील नांदेड येथेही काल दिड तासाच्या अंतराने वडिल व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राज्यभर सुरु असलेल्या मृत्यूच्या तांडवात भीतीपेक्षा जागरुकता दाखवणे गरजेचे आहे. कोविड नियम पाळून अशा गंभीर प्रसंगापासून दुर राहणे शक्य आहे.